Posts

Showing posts from March, 2017

Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 2.

Image
कार्ले येथील अनेक शिलालेखांमधून दिसून येणारी एक विशेष गोष्ट अशी की " धेनुकाकट " या नगरातील अनेक लोकांनी येथे दान दिले आहे आणि त्या मध्ये " यवन " लोकांची संख्याही लक्षणीय आहे . हे " यवन " लोक म्हणजे बॅक्ट्रिया ( सध्याचा उत्तर - पश्चिम अफगाणिस्तान ) येथील ग्रीक लोक होत . या अनुषंगाने प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याकाळीं विविध धर्मांमध्ये असलेले सौहार्दपूर्ण संबंध आणि कुतूहल ! अनेक ग्रीक आणि पर्शिअन लोकांनी बौद्ध लेण्यांना अनेकवेळा भेटी देऊन मुक्त हस्तांनी देणग्याही दिलेल्या दिसतात . यातील काही लोक येथे शिकायलाही आलेले होते , तसेच काहींनी बौद्ध शिकवणही आचरली होती . धेनुकाकट हे नगर नक्की कुठले हे अजूनतरी माझ्या वाचनात आलेले नाही . कोणास याबद्दल माहिती असल्यास कृपया कळवा . ह्या भागात पुढील काही शिलालेख पाहू . चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र . ५ हा लेख खांबाच्या दोन्ही बाजू मिळून लिहिला आहे . पहिल्या वाक्याचा अर्धा भाग डावीकडील बाजूवर तर उर्वरित भाग उजवीकडील बाजूवर ( फुलाच्या वर ) आहे . दुसरे वाक्य परत डावीकडील बाजूवर आहे ....

Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 1.

Image
निवेदन हे सर्व लेख मी फक्त स्वान्तसुखाय लिहिलेले आहेत . यातील कुठलेही लिप्यंतर हे अधिकृत नाही तसेच ते बरोबर असेलच याची खात्री देता येत नाही . या माहितीची सत्यता मी पडताळून पहिली नसल्याने त्याबद्दलची कोणतीही जबाबदारी माझी नाही . कार्ले लेण्यांतील शिलालेख जेम्स बर्जेसने पश्चिम भारतातील जवळपास सर्व लेण्यांचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करून १८८१ साली " इन्सक्रिपशन्स फ्रॉम केव्ह - टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया " हे पुस्तक प्रकाशित केले . भारतीय विद्वान भगवानलाल इंद्रजी पंडित यांनी या कामी बर्जेसला मदत केली . हे सर्व शिलालेख त्यांनी पहिल्यांदा संस्कृतमधे भाषांतरित केले . त्यावरून बर्जेसने त्यांचे इंग्लिश भाषांतर केले . हे सर्व शिलालेख बहुतकरुन ब्राह्मी लिपीमधे खोदलेले आहेत . कार्ले - भाजे लेण्यांना भेट दिल्यानंतर मला या ब्राह्मी लेखांबद्दल खूपच कुतूहल निर्माण झाले . या कुतुहलापोटी मी त्यातील जमेल तितक्या वाक्यांचे स्वतंत्रपणे भाषांतर करीत आहे . एकेका ओळीचे भाषांतर करून त्याची तुलना नंतर बर्जेसच्या पुस्तकातील भाषांतराबरोबर केली आहे . ...